नैराश्यातून बाहेर काढणारी ‘दोस्त’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 

वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी एक इमोशनल फिटनेस ट्रेनर संकेतस्थळ काढणाऱ्या रिचा सिंगचाआयआयटी ते फॉर्ब्सपर्यंतचा विलक्षण प्रवास...

 

नैराश्यया शब्दाचीच मुळात आपणाला भीती वाटते. त्यात मानसिक आजार, मानसोपचार, मानसोपचारतज्ज्ञ म्हटले की तर डोक्यावरुन पाणी. म्हणजे व्याधी, आजार काय ते केवळ शारीरिक आणि मानसिक त्रास असेल तर तुम्ही काही लोकांच्या नजरेतठार वेडेही ठरु शकता. कारण, आजही भारतीय समाजात मानसिक आजार समजून घेण्याची वृत्ती नाहीच. पण, हेच नैराश्य, हीच उदासिनता सध्या मुलांच्या जीवावर बेतली आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, भारतात नैराश्याकडे कायम दुर्लक्षच केलं जातं. त्यात भारतात बेरोजगारीमुळे नैराश्याच्या जाळ्यात अडकलेली मुले सर्वात जास्त आहे. कारण, अशा मुलांना घरातूनच नैराश्याच्या वाटेवर सोडलं जातं आणि असंख्य मुले नैराश्येमुळे आपला जीव गमावून बसतात. अशावेळी त्यांनामृत्यूहाच जवळचा वाटतो. अशाच नैराश्याच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना आशेचा किरण दाखवायचं काम करतेय ती रिचा सिंग. आयआयटीसारख्या नावाजलेल्या संस्थेमधून आपलं शिक्षण पूर्ण करत असताना तिने आजूबाजूला अनेक असे मानसिक रोगी पाहिले. पण, जेव्हा तिला आपल्या जवळचं कोणीतरी या नैराश्यामुळे गमवावं लागलं, तेव्हा तिला या नैराश्येची झळ बसली. रिचाची वर्गमैत्रीण आणि सोबती, जिने आपल्याला महाविद्यालयाकडून नोकरी मिळणार नाही, म्हणजे आपलं आयुष्य संपलं, असं वाटून आत्महत्या केली. या गोष्टीचा रिचाला जबरदस्त धक्का बसला. कारण, आपली मैत्रीण या अशा मानसिक त्रासात आहे, याची तिला पुसटशी कल्पनाही नव्हती. त्यामुळे तिने आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत, असे गृहीत धरले आणि याच अपराधीपणाच्या भावनेतून तिनेयुअर दोस्तची सुरुवात केली.

युअर दोस्तहे खरंतर एक इमोशनल फिटनेस ट्रेनर संकेतस्थळ. या संकेतस्थळावर तुम्हाला मानसोपचारतज्ज्ञ किंवा जर तुम्हाला कुणाशी संवाद साधायचा असेल, तर तुमच्यासाठी अनोळखीदोस्त२४ तास उपलब्ध असतात. मात्र, या अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर काम करणे रिचासाठी खूप कठीण होतं. मुळात रिचा अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत होती. त्यामुळे मानसिक आजार किंवा त्यासंबंधीची माहिती नसल्यामुळे ती एक वर्ष फक्त देशातील आणि जगातील विविध विषयांवर अभ्यास करणाऱ्या काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांना भेटली. यावेळी तिने आपली ही संस्था सुरू करण्याआधी एक सर्वेक्षण करण्याचे ठरविले आणि अत्यंत धक्कादायक बाबी तिच्यासमोर आल्या. यावर रिचा म्हणते की,”आपण मस्करीत किंवा रागात मंद, मूर्ख या शब्दांचा वापर करतो आणि आपल्याला त्याचा काही विशेष परिणाम होईल, असे वाटत नाही. पण, मी जेव्हा सर्वेक्षण केले तेव्हा असे लक्षात आले की, नैराश्यग्रस्त मुलांना या छोट्या-छोट्या शब्दांचा, प्रत्येक गोष्टीचा फरक पडतो.” जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका सर्वेक्षणात भारतातील ४० टक्के मुले ही नोकरी मिळाल्यामुळे किंवा नोकरीसाठीच्या मुलाखतीत पात्र ठरल्यामुळे नैराश्यात जातात; तर काही आपणही याचा भाग होऊ म्हणून नैराश्येत जातात. यातील फक्त २० टक्के मुले या नैराश्यातून मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने बाहेर पडतात आणि उरलेली २० टक्के मुले आत्महत्या करतात किंवा एकलकोंडेपणा वा नशेच्या आहारी जातात. त्यानंतर रिचाने सर्वेक्षणाचाअभ्यास केला. तिच्या लक्षात आले की, ‘संवादहा या सगळ्यावरचा योग्य उपाय आहे. आपण मोठे झालो की, आपला पालकांशी असलेला संवाद कमी कमी होत जातो आणि खरं तर या संवादाची तेव्हा सर्वाधिक गरज असते. आपल्याला वाटतं की, त्यांना माझेप्रॉबेल्म्सकळणार नाही. मुलांची ही स्थिती रिचाने फार जवळून अनुभवली. म्हणून तिने संकेतस्थळ तयार करताना एक स्वतंत्र क्रमांक आणि एक टोल फ्री क्रमांक दिला, ज्याचा वापर करून तुम्ही कधीही आपल्या ट्रेनरशी संवाद साधू शकता. रिचाच्या मते, ”सध्या फिटनेस ट्रेनर असतो. कारण, आपल्याला फिट राहायचे असते. पण, तुमच्या मेंदूचे काय? तो फिट ठेवण्यासाठी आम्ही ट्रेनर देतो.” आतापर्यंतयुअर दोस्तच्या माध्यमातून १२०० लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यात रिचाला यश आले आहे. या संकेतस्थळाचा वापर करणार्यांमध्ये ४३ टक्के असे आहेत, जे आयटी क्षेत्रात नोकरी करीत होते. पण, नोकरी गेल्याने त्यांना नैराश्य आले. महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांत या संकेतस्थळाचा जास्त वापर केला जातो. या सगळ्या प्रवासात रिचाने आतापर्यंत दोन कोटींचा प्रारंभिक निधी जमा केला आहे, तर आजफॉर्ब्सच्या जगातील तरुण व्यावसायिकांमध्ये तिचं नावही समाविष्ट आहे. ”आयआयटीमध्ये घडलेलीतीघटना आणिफॉर्ब्समधील तरुण उद्योजिका हा प्रवास खरंतर देशभरातील माझ्या या सर्वदोस्तांमुळे शक्य झाला आहे,” असं रिचा म्हणते. तुम्हालाही अशादोस्ताची मदत हवी असेल, तर https://yourdost.com/ वर जरुर संवाद साधा. शेवटी, प्रेमचंद यांच्या या चारओळी या नैराश्येसाठी समर्पित कराव्याशा वाटतात,

अंत में सारी चिंताएँ, सारी ग्लानि,

सारा नैराश्य, सारी विडंबना के बदले

एक ठंडी साँस काफी है!

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@