‘नवरा असावा तर असा’: मालिकेत जळगावच्या अमृताचा सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
 
दूरदर्शनवरील कलर्स मराठी या वाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘नवरा असावा तर असा’ या कौटुंबिक व खुमासदार मालिकेत जळगावच्या दीक्षितवाडीतील माहेरवाशिण अमृता प्रसाद नेवे सहभागी झालेल्या आहेत. शनिवारी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या भागाचे प्रसारण होईल.
 
 
प्रसन्न, हसर्‍या व्यक्तिमत्त्वाच्या ख्यातनाम अभिनेत्री हर्षदा खानविलकर संचलित ही मालिका सर्वभाषिक परिवारात सध्या खूपच रसिकप्रिय ठरली आहे.
 
 
अमृता या जिल्हा रुग्णालयासमोरील नेवे परिवारातील ज्योती व योगेश मुकुंद नेवे यांच्या कन्या. त्या सासरी नाशिकला सागर व्हिलेज, धात्रक फाटा येथे वास्तव्यास आहेत.
 
 
त्या आणि त्यांचे पती इलेक्ट्रानिक अँड टेलिकॉम अभियंता प्रसाद प्रल्हाद नेवे (मूळ रा.चुंचाळे ता.यावल) यांच्या वैवाहिक जीवनातील दैनंदिन जीवनातील गमती-जमतीचे खुमासदार चित्रण यात असेल. चित्रीकरण मागील आठवड्यात नाशिकच्या बोधलेनगरात पार पडलेले आहे.
खानविलकर यांनी केले अमृताचे कौतुक
 
 
विशेष म्हणजे अमृता या बी. फार्मसी असून सिल्क थे्रडचे सुंदर, आकर्षक दागिने बनवणार्‍या हौशी कलावंत आहेत. हे दागिने त्यांनी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना भेट दिले.
 
 
त्यांनी ते स्वीकारत दुसर्‍याच दिवशी मुंबईहून त्यांना कौतुकपर संदेश देत आपण हे दागिने नंतरच्या भागात गुलाबी साडीवर परिधान करणार आहोत, असेही आवर्जून कळविले आहे.
@@AUTHORINFO_V1@@