अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांनी पदाचा राजीनामा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाविषयी घेतलेल्या निर्णयांवर नाराज होऊन हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. या राजीनाम्याला पुष्‍टी देणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केले.

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सीरियात आयसीसशी युद्ध करणारे अमेरिकी सैन्य मायदेशी परतणार असल्याची घोषणा केली. या निर्णयाचा रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅट्स दोघांनीही विरोध केला. तसेच इतर अनेक विचारवंतांनीही सडकून टीका केली आहे. “तुमच्या विचारांशी मते जुळणाऱ्या व्यक्तीला संरक्षण मंत्रीपदी नियुक्त करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. या पदावरुन पायउतार होण्यासाठी माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सहकाऱ्यांना आदराने वागवण्याची माझी पद्धत आहे.” असे मॅटिस यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

 

मागच्‍या दोन वर्षापासून मॅटीस यांनी प्रशासनात काम केले. मॅटिस यांच्‍या काळात आपण चांगली प्रगती केली. सहयोगी देशांसोबत संबंध निर्माण करण्‍यासाठी व त्‍यांच्‍याकडून मदत मिळवून देण्‍यात त्‍यांचे विशेष योगदान राहिले. लवकरच नवीन संरक्षण मंत्रीपदासाठी घोषणा केली जाईल. सेवेसाठी जीम यांना धन्‍यवाद.” असे ट्विट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@