कै. आचार्य गजाननराव गरुड यांच्या स्मृतिदिनानिमित्त गरुड महाविद्यालयात रक्तदान शिबीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
शेंदुर्णी : 
 
कै.आचार्य गजाननराव गरुड यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त अप्पासाहेब र.भा. गरुड महाविद्यालय आणि आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था शेंदुर्णी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 
शिबिराच्या प्रारंभी कै. आचार्य गजाननराव गरुड आणि स्व. श्रीमती प्रभावती गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन उपजिल्हाधिकारी जितेंद्रजी पाटील, आ. सुधीरजी तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
याप्रसंगी सागरमलजी जैन शांताराम बापू गुजर, यू.यू.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य वासुदेव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम, किशोर कांबळे, सुनील गरुड, अविनाश निकम, अ‍ॅड. प्रसन्न फासे, नंदू बारी, प्रदीप धनगर श्रीराम काटे, गजानन धनगर, वृषाली योगेश गुजर (नगरसेविका), मधुकर काका चौधरी, नबी शहा, एस. बी. पाटील, विनोद चौधरी, उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे, अशोक जैन, दीपक जाधव, विलास आहिरे, अ‍ॅड देवेंद्र पारळकर, नीलम अग्रवाल उपस्थित होते.
 
 
रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय जळगाव येथील डॉ. अर्जुन सुतार, लक्ष्मीकांत त्रिपाठी, भरत महाले, प्रभाकर पाटील, संदीप साबळे, योगेश सुरवाडे, सुभाष सोनवणे यांनी रक्त संकलन केले.
 
 
यशस्वितेसाठी डॉ प्रशांत देशमुख, डॉ. वसंत पतंगे, प्रा. दिनेश पाटील, प्रा.एस.जी.देहरकर, प्रा. अप्पा महाजन, प्रा.महेश पाटील, प्रा.प्रमोद सोनवणे, प्रा. छाया पाटील, प्रा.वर्षा लोखंडे, पंकज जैन, भारत निकम यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@