‘अनसिन कॉफी’ लघुचित्रपटाला दोन हजार डॉलरचे बक्षीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये होणार कलावंतांचा सत्कार

जळगाव : 
 
शहरात तयार झालेल्या अनसिन कॉफी या लघुचित्रपटाला नुकतेच न्यूझीलंडचे दोन हजार डॉलर अर्थात सुमारे 1 लाखाचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. निमित्त होते ते न्यूझी सॉफ्ट इंटरटेनमेंट या लघुचित्रपट स्पर्धेचे.
 
जळगावातील हरहुन्नरी कलावंतांनी या स्पर्धेत आपला 18 मिनिटांचा लघुचित्रपट सादर केला असता त्याला तेथील ज्युरीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन भारताचाही सन्मान वाढवल्याचे लघुचित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक ऋषिकेश सोनवणे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
 
 
जळगाव शहर हे नेहमीच कलावंतांची खाण असल्याचे पदोपदी निदर्शनास येत आहे. शहरातील कलावंतांनी नाट्य, संगीत आणि नृत्यातून हे दाखवून दिले आहे.
 
 
यावेळी शहरातील तरुण मंडळी ही लघुचित्रपट करून ते स्पर्धेत पाठवून आपले नशीब आजमावत असून त्याची चांगली सुरुवात झाल्याचे यानिमित्ताने बघावयास मिळाले आहे.
 
 
यावेळी उत्तम पटकथा यासाठी ऋषिकेश सोनवणे, अभिनेत्री ज्योत्स्ना हजारे आणि संकलनासाठी विशाल राजे भोसले यांना वैयक्तिक पारितोषिक मिळाले असून लवकरच ते न्यूझीलंड देशातील ऑकलंड येथे पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार असल्याचे समजले आहे.
64 देशांतून अन् 855 चित्रपटातून प्रथम
 
 
भारतातून एकूण 345 लघुचित्रपट सादर करण्यात आले होते, तसेच 64 देशांतून 540 असे एकूण 855 लघुचित्रपटातून अनसिन कॉफीला स्टुडंट कॅटेगरीतून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने कलाकारांनी जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

...मात्र खचलो नाही
 
 
अनसिन कॉफी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी तयार झालो तेव्हा कोणीही मदत केली नाही. मात्र, खचलो नाही. शेवटी नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी बळ दिले आणि हे यश पदरात पडले. अंधेरी, गोरगाव आणि जळगावातही या लघुचित्रपटाचे चित्रीकरण झाले असून मिळालेल्या यशाने खूप आनंद होत आहे.
ऋषिकेश सोनवणे, लेखक, दिग्दर्शक
कलाकारांच्या मदतीसाठी तत्पर
 
 
यातील आम्हाला काहीच कळत नाही. परंतु, कलाकारांना नेहमीच मदत करण्यासाठी आम्ही तत्पर असतो. जेव्हा एक चांगली कलाकृती ही केवळ काही छोट्याशा मदतीसाठी मागे राहत असेल, तर त्याला मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहणार आहोत. कलाकारांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
प्रवीण कोल्हे, नगरसेवक भाजप
@@AUTHORINFO_V1@@