डांभुर्णीत स्वर्गरथाला घाणीच्या साम्राज्याचा विळखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |
डांभुर्णी ता.यावल : 
 
गावकर्‍यांच्या हितासाठी एका संस्थेने लाखो रुपये खर्च कयन स्वर्गरथाची निर्मिती केली. हा रथ सर्व समाजबांधवांच्या उपयोगी येत आहे. गावात कुणाचे निधन झाले की, या संस्थेत कळवून निःशुल्क हा रथ ट्रॅक्टरच्या सहाय्याने वापरला जातो. मात्र, हाच तो स्वर्गरथ बर्‍याच महिन्यांपासून घाणीच्या साम्राज्यात अडकला आहे.
 
 
पंचायतीने महिला शौचालयाची दुरुस्ती केली खरी; परंतु, काही अडचण निर्माण होत असल्याने महिला त्याठिकाणी न जाता चक्क रथाच्या असलेल्या भोवतालच्या परिसरात प्रातःविधीला जातात. तसेच याठिकाणी घाणही टाकली जाते.
 
 
या घाणीच्या साम्राज्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत काही नागरिकांनी पंचायतीला कळवल्यावरही दखल घेतली गेली नसल्याचे नागरिक व महिलांनी सांगितले. गावात समस्यांचा अभाव, स्मशानभूमी नाही, महिलांसाठी प्रसाधनगृह नाही, पुरुषांसाठी शौचालये नाहीत आणि गाव हगणदरीमुक्त नाही, अशाच घाणीमध्ये हा स्वर्गरथ लावला जात असून कुणीही याबाबत बोलण्यास तयार नाही.
 
 
याकडे प्रशासकीय अधिकार्‍यांसह इतरांनीही बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत आहे. डांभुर्णी हे गाव तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात अव्वल झाले. याच गावातील महिलांनी 40 वर्षांतून आज तालुक्यावर सभापतीपद भूषवत आहेत, तरीही गावाची दुर्दशा झाली आहे. स्वर्गरथ हा स्वर्गासारख्या स्वच्छ जागेवर राहील का? ती संस्था व पंचायत याची दखल घेईल का? याकडे लक्ष लागून आहे.
 
स्वर्गरथाच्या आजूबाजूला केरकचरा किंवा महिलांनी शौचालयाला बसू नये, आढल्यास दंड केला जाईल असा सूचना फलक पंचायतीने लावावे. जेणेकरुन त्याठिकाणी घाण होणार नाही.
 
 
कमलाकर कोळी, सामाजिक कार्यकर्ते
 
आमचा येथे रहिवास असून घाणीचे साम्राज्य व महिलांचे उघड्यावर शौचास बसण्याचा आम्हाला त्रास होतो व आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पंचायतीला वारंवार तोंडी कळवूनही कुठलीही कार्यवाही पंचायतीकडून आजपर्यंत झालेली नाही. पावसाळ्यात घरात दुर्गंधी येत असल्याने जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागत आहे.
 
लीना सरोदे, माजी ग्रा.पं.सदस्या
 
गावात समस्यांचा आभाव असून याबाबत कुणालाही सोयरसूतक नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असून ग्रामपंचायतीचा नाकर्तेपणा हा या स्वर्गरथाच्या माध्यमातून उघड दिसत आहे.
 
सुभाष नेहेते, शिवसेना उपविभागीय संपर्क प्रमुख, यावल
 
स्वर्गरथ हा स्वच्छ जागेवर ठेवावा. जेणेकरून स्वर्गरथाची विटंबना होणार नाही व याकडे लक्ष देणे हे ग्रा.पं.प्रशासनाचे कर्तव्य आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रा.पं.तीने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.
 
 किशोर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते
 
सभोवतालच्या परिसरातील नागरिक तेथे केरकचरा टाकत असल्याने तेथे कचरा जमा होतो. परंतु, तेथील घाण ही दोन दिवसात उचलून साफसफाई करतो व तेथे कुणीही घाण करणार नाही, असे नियोजन ग्रामपंचायतीने करावे.
 
सुनील गोसावी, ग्रामविकास अधिकारी
 
स्वर्गरथाच्या चहूबाजूने घाणीचे उकिरडे असल्याने व अस्वच्छतेमुळे स्वर्गरथाची विटंबना होत आहे तरी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 
भरत सोनवणे, माजी ग्रा.पं.सदस्य
@@AUTHORINFO_V1@@