पहूर येथील अर्णव जोशी स्केटिंग स्पर्धेत तिसरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

 
पहूर : 
 
पहूरपेठ येथील रहिवासी अर्णव मनोज जोशी याने मलकापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत यश संपादन करून तिसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळे गावाचा गौरव राज्य स्तरावर झाला आहे.
 
 
मलकापूर स्केटिंग क्लब व सुंदराबाई फाउंडेशन यांच्या वतीने पाचवी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा मलकापूर येथे रविवारी घेण्यात आली.
 
 
सात ते आठ वयोगटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत अर्णव जोशी याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याला कांस्यपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. तो लॉर्ड गणेशा स्कूलचा इयत्ता पहिली वर्गातील विद्यार्थी आहे.
 
 
स्केटिंगचे प्रशिक्षक आनंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पत्रकार मनोज जोशी यांचा चिरंजीव तर सीए विनोद जोशी यांचा पुतण्या होय.या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@