आरोग्यासाठी मैदानी खेळाला पर्याय नाही : साधनाताई महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

जामनेरला सी.एम.चषक स्पर्धेचे उद्घाटन


 
जामनेर : 
 
शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त मैदानी खेळ खेळावेत. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळाला पर्याय नाही, असे प्रतीपादन नगराध्यक्षा साधना महाजन यांनी येथे केले.
 
सी.एम.चषक अंतर्गत सुरु झालेल्या 400 मीटर व 100 मीटर धावण्याच्या (स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा महाजन यांच्या हस्ते क्लॅप वाजवून करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
 
यावेळी व्यासपीठावर जि.प.च्या सभापती रजनी चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष चंदू बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, पालिकेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, आतिष झाल्टे, योगेश मोते, सुहास पाटील, तेजेश पाटील,मयूर पाटील, रवींद्र झाल्टे, धर्मराज शिंधे, सागर पाटील, नरेंद्र केने, विजय शिरसाड आदी उपस्थित होते. 17 ते 19 वर्षाखालील विद्यार्थी आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली होती.
 
 
स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक कपिल शर्मा, व्ही.आर. पाटील, डी. के. चौधरी, बी. एल. तुरे, जी. सी. पाटील, भाऊसाहेब निकम, व्ही.एन.पाटील, रवी जाधव, आनंद मोरे, पी. डी. पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@