वंचित शेतकर्‍यांना मिळणार पीकविम्याचा लाभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

खा.रक्षाताईंनी घेतली एचडीएफसीच्या व्यवस्थापकांची भेट

 
 
 
 
मुक्ताईनगर :
 
आंबिया बहर केळी व फळपीक विमा योजना 2017 मधील 6400 शेतकरी यांनी प्रीमियम भरला. त्यापैकी 4100 शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळाला.
 
1600 शेतकर्‍यांचे नाव, क्षेत्र चुकल्याने 500 शेतकर्‍यांची माहिती पोर्टलवर अपलोड न झाल्याने पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत.
 
 या शेतकर्‍यांना या पीकविम्याचा लाभ मिळावा, यासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, आशिष कुमार भूतानी, सचिव कृषी विभाग यांच्या सूचनेनुसार खा. रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून जेडीसीसी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, कृषी विभागाचे अधिकारी असे शिष्टमंडळ यांनी 19 रोजी मुंबईत एचडीएफसी अ‍ॅर्गो या इन्शुरन्सचे व्यवस्थापक अभिषेक मिश्रा, उपाध्यक्ष रणबीर चडढा यांची भेट घेतली.
 
 
या बैठकीतील चर्चेनुसार वंचित शेतकर्‍यांसाठी जेडीसीसी बँकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पोर्टलचे अधिकारी यांची उद्या पुण्याला बैठक होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@