विनायक मेटेंकडून शिवस्मारकाचे भूमीपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |



मुंबई : अरबी सममुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी गुरूवारी केल्याची माहिती समोर आली आहे. काही मोजक्याच मंडळींच्या मदतीने हे भूमीपूजन करण्यात आले. यापूर्वी भूमीपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान एका बोतटीला अपघात झाला होता. त्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भूमीपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वीच शिवस्मारकाचे अरबी समुद्रात जलपूजन केले होते. त्यानंतर आता मोजक्याच लोकांना कल्पना देत मेटे यांनी शिवस्मारकाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान विरोधकांनीही यावर टीका केली आहे. एकाच स्मारकाचे किती वेळा भूमीपूजन करण्यात येणार आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

 

शिवस्मारकाच्या खर्चात १ हजार कोटींची वाढ

 

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या खर्चात तब्बल १ हजार कोटींची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवस्मारकाच्या कामाला होणा-या विलंबामुळे ही वाढ झाली आहे. शिवस्मारकाच्या उभारणीसाठी २ हजार ६९२ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. परंतु कामाला होणा-या विलंबामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, शिवस्मारकाच्या भूमीपूजनावरच ८ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तसेच केवळ बांधकामाच्या खर्चात ३०९ कोटींची वाढ झाली असून स्मारकाच्या इतर कामांच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

 

मेटे यांनी भूमीपूजन का केले याचे कारण तेच सांगू शकतील. अंधारात भूमीपूजनाचा कार्यक्रम करणे योग्य नाही.”

माधव भंडारी. प्रवक्ते, भाजप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@