जळगावच्या रुद्र दलालने गाजवली सागरी जलतरण स्पर्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
शिरसोली नाका परसरातील डीमार्टसमोरील रहिवासी आणि रुस्तमजी इंग्रजी माध्यमशाळेतील तिसरीतील विद्यार्थी रुद्र धीरज दलाल (वय 10 वर्ष) याने मालवणच्या सागरात झालेल्या जलतरण स्पर्धेत फ्रीस्टाईल गटात 1 किलोमीटरचे अंतर 13 मिनिटात पूर्ण केले.
 
भर थंडीत आणि सागरी लाटांशी सामना करीत त्याने ही चमक दाखवली. या धाडसाबाबत त्याचे शाळेत कौतुक करण्यात आले. त्याला प्रशिक्षक राजेश गजानन नेवे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
रेणुका माता टेन्ट हाऊसचे प्रकाश चिमण दलाल आणि चोपड्याचे डॉ.विलास दत्तात्रय नेवे यांचा तो नातू आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज दलाल यांचा तो सुपुत्र आहे.
 
अतिशय कमी वयात मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@