पाकिस्तानने केला 'हा' आगळावेगळा विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |


 


लाहोर : पाकिस्तानने एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे. या विक्रमासह पाकिस्तान हा गाढवांची संख्या सर्वाधिक असलेला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. येथे गाढवांची संख्या ५ दशलक्षांच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे फक्त लाहोरमध्ये ४१ हजार गाढवे आहेत. याशिवाय चीनचा यामध्ये पहिला नंबर आहे तर युथोपियाचा दुसरा नंबर लागतो.

 

गाढव हा शब्द म्हणजे आपल्याकडे मूर्ख म्हणून संबोधला जातो. गाढवांचा वापर बहुतेक ओझी वाहून नेण्यासाठी होतो. आता या गाढवांची संख्या पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गाढव हा उपयुक्त आणि निरुपद्रवी प्राणी असला तरी, या विक्रमामुळे पाकिस्तानचे हसे झाले आहे. अहवालात माहिती मिळाल्यानुसार, या गाढवांची किंमत ३५ हजार ते ५५ हजारांपर्यंत आहे. प्रत्येक गाढव दिवसाला १ हजार रुपये मिळवून देण्यात मदत करते. गाढवांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसायही चांगला बहरला आहे. त्यातून चांगला नफा मिळत आहे, असे गाढवांची पैदास करणाऱ्या व्यावसायिकाने सांगितले.

 

गाढवांची वाढती संख्या लक्षात घेऊन पाकिस्तानातील पंजाब सरकारने त्यांच्यावरील मोफत उपचारांसाठी रुग्णालयाची व्यवस्था केली आहे. याचा अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडत आहे. या गाढवांच्या मालकांनी गाढवांमुळे चांगला व्यवसाय होत असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांचा गाड्या आणि सामान वाहण्यासाठी तसेच, बांधकामाच्या ठिकाणीही उपयोग होत असल्याचे सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@