पीएनबीच्या दहा अधिकाऱ्यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) १० अधिकाऱ्यांना ९ कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणात अटक केली आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डी हाऊस शाखेतून चंद्री पेपर्स अॅण्ड एलाईड प्रोडक्ट्स कंपनीला ९ कोटींचे हमीपत्र (एलओयू) दिले.

 

२ एप्रिल, २०१७ रोजी बेल्जियम येथील स्टेट बॅंकेच्या शाखेच्या नावे एलओयू देण्यात आले होते. चंद्री पेपर्स अॅण्ड एलाईड प्रोडक्ट्स कंपनीने ही रक्कम परत न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. एलओयू अंतर्गत परदेशातील बॅंकांकडून घेतलेल्या रक्कमेसाठी दिले जाते.

 

या प्रकरणी मनोज खरात (सिंगल विंडो ऑपरेटर), अमर जाधव (सिंगल विंडो ऑपरेटर), सागर सावंत (सिंगल विंडो ऑपरेटर), बच्चू तिवारी (व्यवस्थापकीय अधिकारी), यशवंत जोशी (व्यवस्थापक) , संजय प्रसाद (शाखा व्यवस्थापक), प्रफुल्ल सावंत (अधिकारी), मोहिंद्र शर्मा (वरिष्ठ लेखापाल), अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण ब्रीच कॅण्ड शाखेत कार्यरत होते. बॅंकेचे निवृत्त कर्मचारी गोकूळनाथ शेट्टी याचेही नाव असून त्यांचीही चौकशी सुरू असल्याचे सीबीआयने सांगितले. नीरव मोदीच्या प्रकरणात शेट्टी सह मनोज खरात याचीही चौकशी सुरू आहे. नीरव मोदीने केलेला गैरव्यवहारही याच शाखेत झाला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@