सिडको रहिवाशांसाठी खुशखबर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |


औरंगाबाद : सिडकोच्या घरांमध्ये राहणाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातल्या सिडकोच्या जागेतील घरांना आता मालकी हक्क मिळणार आहे. सिडकोतील लीज होल्ह प्रॉपर्टी आता फ्री होल्डमध्ये परावर्तीत करण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी औरंदाबादमध्ये जाहीर केला आहे.

 

सिडकोच्या घरांमध्ये राहणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोतील लीज होल्ड प्रॉपर्टी आता फ्री होल्डमध्ये परावर्तित असणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सिडकोच्या जागेतील घरांना मालकी हक्क मिळणार आहे.

 

सिडकोने काही जागा लोकांना लीजवर दिल्या होत्या. त्यामुळे सरकारची ती प्रॉपर्टी रहिवाश्यांना विकता येत नव्हती. त्यावर त्यांचा मालकी हक्क नव्हता. त्यामुळे लोकांची मोठी कोंडी होत होती पण सरकारच्या या निर्णयामुळे आता या जागेचा मालकी हक्क मिळणार आहे. आता नागरिक प्रॉपर्टी विकूही शकणार आहेत.

 

या वर्षी नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने मोठा गृहप्रकल्प उभारला आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १८ लाखाचे घर तर अल्प उत्पन्न गटासाठी २६ लाखचे घरे उपलब्ध आहेत.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@