एमआयएमला दूर ठेवा; प्रकाश आंबेडकरांना निरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |


मुंबई : भारिप बहुजन महासंघाला आघाडीत यायचे असल्यास त्यांना एमआयएम पक्षाला दूर ठेवावे लागेल, अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांनी घेतली आहे. याबाबतचा निरोपही त्यांनी प्रकाश आंबेडकरांना पाठवल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.

 

दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमला सोबत घेऊनच आघाडी करू, अशी इच्छा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. प्रकाश आंबेडकर या भूमिकेवर ठाम असल्याने आघाडी होईल का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याची इच्छा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. पण आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला दूर ठेवावे, असं आघाडीच्या नेत्यांना वाटते आहे.

 
 

एमआयएमची साथ सोडणार नाही : प्रकाश आंबेडकर

 

आघाडीच्या नेत्यांनी निरोप दिल्यानंतर यावर आता प्रकाश आंबेडकरांनीही आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीचा आमच्यासोबत चर्चेचा केवळ फार्स आहे. आम्ही एमआयएमची साथ सोडणार नाही,' अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. यामुळे विरोधकांचे महाआघाडीचे स्वप्न भंगेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@