भाजपा जळगाव महानगर व भाजयुमोतर्फे जळगावविधानसभा क्षेत्रांतर्गतसी.एम.चषक स्पर्धा आजपासून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
 
जळगाव विधान सभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी महानगर व भाजयुमो जळगाव यांच्यावतीने सी.एम.चषक स्पर्धांना गुरुवार, 20 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.
 
 
सी.एम.चषक अंतर्गत क्रिकेट स्पर्धेला सकाळी 8 वाजता एकलव्य क्रीडा संकुल येथे प्रारंभ होणार आहे. क्रिकेट स्पर्धेत 80 संघांनी सहभाग नोंदविला आहे. 21 व 22 रोजी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांना सुरुवात होणार आहे.
 
 
22 रोजी कॅरम, खो-खो स्पर्धांचे क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले असून बुद्धिबळ स्पर्धा भाजपा कार्यालय तर 23 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा गांधी उद्यान, रांगोळी स्पर्धा दाणाबाजार, नृत्य स्पर्धा कांताई सभागृह, कुस्ती स्पर्धा क्रीडा संकुल येथे होणार असून कबड्डी व हॉलीबॉल या स्पर्धांचादेखील आयोजन करण्यात येणार आहे.
 
 
स्पर्धा यशस्वितेसाठी आ.राजूमामा भोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो अध्यक्ष व स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, सी.एम.चषक संयोजक भूपेश कुलकर्णी, क्रीडा अध्यक्ष राजू खेडकर, रियाझ शेख, हेमंत भंगाळे, महेश पाटील, स्नेहा खडके, आनंद सपकाळे, रमेश मौर्य, वैभव चौधरी, जितेंद्र चौथे, हर्षल नेवे, विकी सोनार, अक्षय कोल्हे, बाला सोनवणे भाजप सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, राजेंद्र घुगे पाटील, दीपक सूर्यवंशी, बापू ठाकरे, राहूल वाघ, मयूर कापसे, महेश चौधरी, सुरेखा तायडे, ज्योती चव्हाण, कैलास सोनवणे, नितीन इंगळे, विरेन खडके, शुभम जोशी आदि नियोजन करीत आहे, असे प्रसिद्धी प्रमुख हर्षल नेवे यांनी कळविले आहे.
5200 स्पर्धकांचा सहभाग निश्चित
 
 
स्पर्धेत नावनोंदणीसाठी खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यात कॅरम (951 सहभागी), बुद्धिबळ (470 सहभागी), चित्रकला (425 सहभागी), रांगोळी (900 सहभागी), नृत्य स्पर्धा (125 सहभागी), अ‍ॅथलेटिक्स (1900 सहभागी), कबड्डी (28 संघ), कुस्ती (235) हॉली बॉल व खो-खो (6 संघ) अशाप्रकारे एकूण 5200 स्पर्धकांनी आपला सहभाग निश्चित केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@