विराट 'अव्वल'च तर पुजारा चौथ्या स्थानी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |


 
 

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाचा कोणताही परिणाम कर्णधार विराट कोहलीच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत झाला नाही. दुसऱ्या कसोटीत एकीकडे पूर्ण भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले असताना विराटने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते. याच जोरावर विराटने आयसीसी कसोटी क्रमवारीत ९३४ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

 

भारताच्या चेतेश्वर पुजारानेही फलंदाजांच्या क्रमवारीत २ मिळवून चौथे स्थान पटकावले आहे. त्याच्या खात्यात ८१६ गुण जमा आहेत. कसोटी क्रमवारीत पहिल्या १०मध्ये असणारा पुजारा हा विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. गेले अनेक दिवस विराटने आपल्या सातत्यपूर्ण खेळामुळे कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ९१५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ ८९२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटने स्मिथवर एका वर्षाची बंदी घातली असल्याने तो वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@