गजाननराव गरुड यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजपासून शेंदुर्णीत व्याख्यानमाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

 
 
शेंदुर्णी : 
 
विधानसभेचे उपसभापती आणि श्रेष्ठ वक्ते, भाषा पंडित आणि अध्यात्मिक विचारक कै. बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आणि व्याख्यानमालेचे आयोजन 20 ते 23 डिसेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे.
 
 
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप.सोसायटी आयोजित कै. आचार्य गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमाला 2018 अंतर्गत 21 डिसेंबर रोजी रायगड येथील शिवव्याख्याते प्रा. प्रशांत देशमुख हे छत्रपती संभाजी महाराज या विषयावर पहिले पुष्प, तर 22 डिसेंबर रोजी संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. तुळशीराम गुट्टे ‘वारकरी संप्रदायात संत मुक्ताबाईचे योगदान’ या विषयावर दुसरे आणि 23 डिसेंबर रोजी तिसरे पुष्प ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व.बा.बोधे ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ या विषयावर गुंफणार आहेत.
 
 
स्मृतिदिनानिमित्त वारकरी शिक्षण संस्था धुळेचे अध्यक्ष ह.भ.प.गोपाळ महाराज सांजोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. स्मृतिदिनाचा मुख्य कार्यक्रम आ. ग.र.ग. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे. या कार्यक्रमात गणवेश आणि बक्षिसांचे वाटप होणार आहे.
 
 
रुग्णांना फळे वाटप सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आहे. आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था व रा.से.यो. एककाच्या वतीने अप्पासाहेब र.भा. गरुड महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
या कार्यक्रमात शेंदुर्णीच्या व पंचक्रोशीतील श्रोतावर्गांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी व व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष सागरमल जैन यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@