माजी नगराध्यक्ष चौधरी यांना आदरांजलीनेचाळीसगाव पालिकेची सभा तहकूब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |
चाळीसगाव :
 
पालिकेच्या नगरपरिषदेची बुधवारी सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी आयोजित करण्यात आली होती.
 
 
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी आशालता चव्हाण तर मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. दिवंगत मधू आण्णा चौधरी यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडून सभा तहकूब करण्यात आली.
 
 
सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी नगराध्यक्ष मधू आण्णा चौधरी यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांनी 30 वर्षे पालिकेचे नगरसेवक तथा नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात यावी, अशी सूचना सदस्य सुरेश चौधरी व रामचंद्र जाधव यांनी मांडली.
 
 
यावर शहर विकास आघाडीचे नेते माजी आ. राजीव देशमुख यांनी मधू आण्णा चौधरी यांची पालिकेचे माध्यमातून जनतेच्या सेवेची कारकीर्द गौरवपूर्ण असल्याची भावना व्यक्त केली. त्याला सत्ताधारी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी सहमती दर्शविली आणि आजची सभा तहकूब करण्यात आली.
 
 
सभागृहात पालिकेचे विरोधी पक्ष नेते माजी आ. राजीव देशमुख, सत्ताधारी पक्षाचे गटनेते राजेंद्र चौधरी, शहर विकास आघाडीचे उपनेते सुरेश स्वार, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील, आण्णासाहेब कोळी, रामचंद्र जाधव, शेखर देशमुख, बापू आहिरे, आनंद खरात, सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी, चिराग शेख, चंद्रकांत तायडे, संजय पाटील, दीपक पाटील, विजया प्रकाश पवार, वत्सलाबाई महाले, रंजनाबाई सोनवणे, योगिनी ब्रह्मणकार, सविता राजपूत, मनीषा देशमुख, वंदना चौधरी, वैशाली मोरे, वैशालीताई राजपूत, विजया भिकन पवार, सायली जाधव, मानसिंग राजपूत, गीताबाई राजपूत, झेलाबाई पाटील, संगीता गवळी उपस्थित होते. यावेळी सभा लिपिक दीपक देशमुख यांनी दिंवगत मधू आण्णा चौधरी व पालिका कर्मचारी मयूर वाघ यांच्यावरील शोकप्रस्ताव मांडला. सभेच्या सुरुवातीला सदस्यांनी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली. तहकूब झालेली सभा सोमवारी 24 रोजी होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@