चाळीसगाव नगरपालिका इमारतीला ‘शिवरायां’चे नाव द्या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

लोकनेते पप्पूदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठानची मागणी

चाळीसगाव : 
 
न.पा. व सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, महाराजांची कीर्ती ही भारतालाच नव्हे तर जगाला माहीत आहे. तरी त्यांच्यासारखा चारित्र्य संपन्न राजा जगाच्या पाठीवर दुसरा नाही. स्वराज्य निर्माण करताना महाराजांनी जातीवंत बाराबलुतेदारांना सोबत घेऊन एक आदर्श स्वराज्य संपूर्ण जगासमोर निर्माण केले.
 
त्यांची कीर्ती डोळ्यासमोर ठेवून आपल्या चाळीसगाव नगरपालिकेच्या इमारतीला व सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिका चाळीसगाव असे नाव देण्यात यावे, असे न झाल्यास आम्ही तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करू व उद्भवणार्‍या परिस्थितीस शासन स्वत: जबाबदार असेल, याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
 
 
यावेळी राहुल पाटील, सचिन फुलवारी, रोशन चव्हाण, आप्पा पाटील, अजय चौधरी, स्वप्निल वैतकर, पवन सैंदाने, मनीष सैंदाने, भूषण गुजर, शुभम माने, सागर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@