जोमाने कामाला लागा, मुख्यमंत्र्यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : भाजपने आगामी लोकसभेच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. येत्या निवडणूकीत शिवसेनेसह युती झाली तर चांगलेच परंतु, असे न झाल्यास एकट्याने निवडणूक लढवू, पराभवाला घाबरुन चालणार नाही. जोमाने कामाला लागा, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजप आमदार व खासदारांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

 

हिंदी भाषिक राज्यात मतदारांनी जरी कॉंग्रेसला कौल दिला असला तरीही खचून जाऊ नका. पुन्हा मोठ्या जोमाने कामाला लागा. आपल्या मित्र पक्षांच्याशी मी संपर्कात आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आपली भूमिका राहणार आहे. शिवसेनेशीही युतीची बोलणी सुरू आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. भाजपने आपल्या सरकारच्या कामांचा आलेख जनतेसमोर ठेवला पाहिजे. सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला कसा करुन देता येणार यावर काम करावे लागणार आहे. सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचा लाभ आपल्याला होईल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@