37 तिकीट निरीक्षकांना पारितोषिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

4.57 कोटी रुपयांचे उत्पन्न; डीआरएम आर. के. यादव यांच्याकडून सन्मान

 
 
भुसावळ : 
 
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वाणिज्य विभागातील 37 कर्मचार्‍यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मचार्‍यांना 17 डिसेंबर रोजी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
भुसावळ विभागाच्या 37 तिकीट निरीक्षक कर्मचार्‍यांनी नोव्हेंबरमध्ये 4.57 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. याबद्दल डीआरएम आर. के. यादव यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.
 
 
यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार उपस्थित होते. डीआरएम यांनी कर्मचार्‍यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करून भविष्यातही असेच कार्य करत राहा, असे आवाहन केले.
 
 
पारितोषिक प्राप्त टीसी बी. पी. सिंह, विनय ओझा, आर. के. गुप्ता (भुसावळ), एम. एम. शिंदे (मनमाड), महबूब जंगलू, एस. के. दुबे, पीयूष कुमार (भुसावळ), ए. के. मिश्रा (मनमाड), अमित शर्मा, राजपाल सिंह (भुसावळ), एस. एन. खान (मनमाड), पी. एच. पाटील (भुसावळ), जे. के. शर्मा (खंडवा), शेख अल्ताफ, एस. एम, पुराणिक (भुसावळ), एस. एस. साव (खंडवा), आर. सी. केसरी, मो. रफीक लाडजी, मुन्ना कुमार श्रीवास्तव, ए. एम. खान, एस. पी. मालपुरे, पी. एम. पाटील, रमाशंकर प्रधान (भुसावळ), हिरालाल राम (खंडवा), मो. अबिद्दुल्ला, ए. के. गुप्ता (भुसावळ), रंजना संसारे (मनमाड), अरुण कुमार मिश्रा, शेख जावेद, अनिल खर्चे (भुसावळ), टी. बी. नुनसे (मनमाड), निसार खान, रंजित शर्मा, मंगेश पाठक (भुसावळ) यांचा समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@