मा .खासदार गुणवंतराव सरोदे यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

 
जळगाव :
 
भारतीय जनता पार्टी चे माजी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार डॉ गुणवंतराव रामभाऊ सरोदे यांचे प्रदीर्घ आजाराने रविवार दि २ डिसेंबर २०१८ रोजी, दु १२.१५ वा दुःखद निधन झाले ते ७८ वर्षांचे होते .
प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना जळगाव शहरातील सहयोग क्रिटिकल सेंटर मधे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .मात्र त्यांची प्रकृती सतत खालावतच गेली ,उपचारांना फारसा प्रतिसाद न मिळता अखेर येथेच आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला .
त्यांची कर्मभूमी असलेल्या सावदा येथे आज दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील .
 
डॉ.गुणवंतराव सरोदे यांचा जन्म 3 एप्रिल 1940 ला मस्कावद ता.रावेर येथे झाला . त्यांनी पुणे येथून वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले. सावदा येथे त्यांनी वैद्यकिय सेवा सुरु केली. डॉ.सरोदे यांनी 1978 मध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर रावेर विधानसभेची निवडणूक लढली. 1985 मध्ये प्रथमच रावेर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले.1989 मध्ये त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवली व त्यात त्यांचा पराभव झाला.1991 व 1996 ला जळगाव लोकसभा मतदारसंघाचे ते भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले. जिल्हातील पहिले भाजपा आमदार आणि खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला. 1995 ला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नी श्यामला यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा अतुल व सून प्रिया दोन मुली किशोरी व विद्या असा परिवार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@