गोवर-रुबेलामुक्त भारताचे स्वप्न साकार करू : डॉ. पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

 
पहूर ता.जामनेर :
 
गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवून ‘गोवर -रुबेला मुक्त भारताचे स्वप्न साकार करूया ’ असे प्रतिपादन वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी केले.पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित गोवर- रुबेला लसीकरण शिबीरप्रसंगी ते बोलत होते .
 
अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे होते. त्यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच ज्योती घोंगडे, लक्ष्मण गोरे, सचिव भगवान घोंगडे, संचालक युसूफ बाबा, अशोक बनकर, प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना बनकर, नोडल टिचर माधुरी बारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
 
यावेळी 486 पैकी 438 विद्यार्थ्याचे लसीकरण करण्यात आले. प्रास्ताविक शंकर भामेरे यांनी तर सूत्रसंचालन चंदेश सागर यांनी केले. बी.एन.जाधव यांनी आभार मानले.
 
यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक ए. एस. सुरडकर, आरोग्य सेवक आर.बी.पाटील, आर.व्ही. भिवसने, आर.पी.जाधव, आर. एन. वाणी, एस पी.पवार, वाय. पी.कोकाटे, आय.पी.कराडे, जे.एम.भंगाळे, आत्माराम नरवाडे, विजय पांढरे, नारायण तुपकर, संगीता सोनवणे, आशा सेविका माधुरी पाटील, उज्ज्वला तेले, भारती तायडे, अनिता शिंदे, निर्मला पवार, बेबी राऊत, सरिता पाटील, सविता सरपटे यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@