मेहरुण परिसरातून तीन लाखाची गावठी दारु नष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

शहरात दारू विक्री करणार्‍यांवर धाडसत्र सुरुच

 
जळगाव : 
 
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारु विक्री करणार्‍यांवर पोलिसांनी धाडसत्र सुरु ठवले आहे. दरम्यान, शनिवारी गवळीवाडा, तांबापुरा, कंजरवाडा, मेहरुण या भागात कारवाईत एकूण 3 लाख 7 हजार 830 किंमतीची गावठी हातभट्टीची दारु व साहित्य नष्ट करण्यात आले. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन, शहरातील गवळी वाडा, तांबापुरा, मेहरुण भागात पलमा उर्फ बलमा चंदन गुमाने, अलका कांती बाटुंगे (रा. कंजरवाडा, तांबापूर, जळगाव) हे तांबापुरा खदानीत गावठी हातभट्टी दारु तयार करीत असतांना त्यांच्याकडून 1 लाख 2 हजार 640 किंमतीचे दारु साहित्य जप्त करण्यात आले.
 
तर वर्षा सतीश बाटुंगे, मालाबाई सुरेश बाटुंगे, रेखाबाई सूर्यभान अभंगे, कविता विलास माचरे, बेबीबाई भारत बाटुंगे, ममता मंगेश अभंगे, राणी रविंद्र बाटुंगे (सर्व रा. कंजरवाडा, तांबापूर, मेहरुण, जळगाव) यांना गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असतांना पोलिसांनी करवाई करीत 2 लाख 1 हजार 590 किंमतीचे हातभट्टीची साहित्य व दारु जप्त करण्यात आली. दरम्यान, एकूण 3 लाख 7 हजार 830 किंमतीची गावठी हात भट्टीची दारु व साहित्य नष्ट करण्यात आले.
 
यांनी केली कारवाई
 
सहायक पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, उपनिरीक्षक रमेश वावरे, राजकुमार ससाणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, प्रकाश निंबाळकर, पोहेकाँ रामकृष्ण पाटील, दिनकर खैरनार, रतीलाल पवार, अतुल पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, हेमंत कळसकर, किशोर पाटील, असीम तडवी, निलेश पाटील, महिला कर्मचारी मिनाश्री घेटे, आशा पांचाळ यांनी ही कारवाई केली.
@@AUTHORINFO_V1@@