थोरगव्हाणला कालभैरव यात्रा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

परंपरेनुसार डफडी, ढोलच्या निनादात चांदीच्या मुकुटाची मिरवणूक


 
सावदा : 
 
येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथे कालभैरव यात्रा नुकतीच उत्साहात साजरी झाली.गावातील मूळ पुरातन कालभैरव मंदीरातून डफडी व ढोलाच्या नादात चांदीचा कालभैरव मुखवटा व मुकूट मिरवणूक भगतांच्या उपस्थितीत निघते.
 
मिरवणूक गावाबाहेरील नवीन कालभैरव मंदिरावर पिंपळा खालील आकाशातून प्रगट झालेल्या अश्मी सदृश्य मूर्तीवर मुकुट, मुखवटा चढविला जातो.
 
आरती झाल्यावर बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत यांचा भक्तांनी घरून आणलेल्या नैवेद्य दाखविता जातो. पहिल्या भक्ताने अर्पण केलेला नैवेद्य दुसर्‍या भक्ताला प्रसाद स्वरूपात दिला जातो.
 
त्यांनतर दुपारी एक ते पाच वाजेला पाच हजार माता-भगिनी समर्थ सेवेकर्‍यांनी पूज्य अप्पांच्या मार्गदर्शनाने भैरवचंडी होम पार पडला व दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले.
 
मुकूट चढविल्यावर दर्शनासाठी नैवैद्य घेऊन गावोगावचे नागरिक दुसर्‍या दिवसापर्यंत दुपारपर्यंत येत होते.
आमची गाव शेती वाडीवर आलेले संकट दूर, व शेतातील पाणी पुरेसे असते ती भैरवनाथजींचीच कृपा आहे, अशी भावना प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत पाटील व प्रगतिशील शेतकरी पंकज पाटील यांनी व्यक्त केली.
यात्रेमध्ये भाविकांना जेवण
 
पहिल्या दिवशी यात्रेला आलेल्या पाहुण्यांना वरणपोळी -भरीत भाकरी शिर्‍याचे जेवण मग दुसर्‍या दिवशी गाव पंगत असते, असे हे पाहुण्यांचे श्रद्धेनेे अनोखे आदरातिथ्य व परंपरेने यात्रा साजरा करणारे जपणारे पंचक्रोशोतील एकमेव गाव म्हणावे लागेेल. चांदीचा मोठा आकर्षक मुखवट्याची मिरवणूक लक्षवेधी ठरली.
@@AUTHORINFO_V1@@