जि.प.ची 11 रोजी विशेष सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

निधीच्या फेरनियोजनासाठी सभेचे आयोजन



 
जळगाव : 
 
जिल्हा परिषदेत 11 डिसेंबर रोजी 12 वा. विशेष सभेचे नियोजन करण्यात आले आहे. जि.प.च्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत समान निधीच्या मुद्यावरून भाजपाच्या 18 सदस्यांनी विरोधी भूमिका घेतली होती.
 
भाजपासह सेना, राष्ट्रवादीच्या 49 सदस्यांनी समान निधीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला भाजपाच्या 18 सदस्यांनी पाठिंबा दिल्याने सभागृहात गोंधळ झाला होता.
 
त्याअनुषंगाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी बैठक घेऊन अध्यक्षा, सभापती व भाजपाच्या सदस्यांना समान 30 लाखाचा निधी देण्याचा निर्णय घेतला. सेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांना प्रत्येकी साडेबारा लाखाच्या निधी नियोजन करण्यात आले आहे.
 
जि.प.ला डीपीडीसीकडून प्राप्त झालेल्या नियत्वाचे नियोजनाबाबतचा विषय सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. हा ठराव विरोधकासह भाजपाच्याच सदस्यांनी नामंचूर केला होता.
 
निधीच्या वाटपाच्या निर्णयांनतर नियोजनातील फेरबदल मंजूर करून घेण्यासाठी, हा ठराव नव्याने मांडून त्यास विशेष सभेची मंजूर घेण्यात येणार आहे. या विशेष सभेत त्यात 11 ते 12 विषयांवर चर्चा होणार असल्याचे समजते.
 
या सभेला दोन तृतीयांश सदस्यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या अधिकारात ही विशेष सभा घेतली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@