जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालयात, जळगाव यांच्यातर्फे जागतिक एड्स दिन व सप्ताह निमित्ताने 1 डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयापासून प्रभातफेरी काढून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

जागतिक एड्स नियंत्रण सप्ताहाची सुरुवात, जिल्ह्यात विविध कार्यक्रम


 
जळगाव : 
 
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालयात, जळगाव यांच्यातर्फे जागतिक एड्स दिन व सप्ताह निमित्ताने 1 डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयापासून प्रभातफेरी काढून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
 
एचआयव्ही एड्सविषयी पोस्टर्स सिव्हिल आवारात लावण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या हस्ते सकाळी 8 वा. करण्यात आले.
 
दिशा बहुउददेशीय संस्थेतर्फे विनोद ढगे आणि सहकार्‍यांतर्फे एचआयव्ही, एड्स जनजागृतीपूर्वक पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांसह अधिष्ठाता व विधी सेवा प्राधिकरण न्यायाधिश ठोबरे यांच्या हस्ते शपथ देण्यात आली. डॉ.भास्कर खैरे यांच्या हस्ते प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखविला. प्रभातफेरी नागोराव चव्हाण, अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, न्यायाधिश ठोबरे यांनीही सहभाग घेेतला.
 
जिल्हाधिकारी निंबाळकर यांचे स्वागत जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी या वर्षाचे जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य असलेले सन्मान चिन्ह देऊन केले.
 
प्रस्ताविकात संजय पहूरकर यांनी जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कार्यालयांतर्गत जिल्हयात विविध सुविधा केंद्राची माहिती दिली. त्यामध्ये एच.आय.व्ही.बाधीत व्यक्तींना मोफत औषधोपचार व तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शासनाचे नवीन एआरटी धोरणाबददल माहिती दिली.
 
प्रभातफेरी बेडाळे चौक - चित्रा चौक - शिवाजी पुतळा चौक- नवीन बस स्टँड - स्वातंत्र्य चौकातून पुन्हा जिल्हा रुग्णालयात परतली. प्रभातफेरीमध्ये विविध प्रकारे घोषणा दिल्या.
 
यशस्वीतेसाठी गिरीश गडे, शुभांगी पाटील, महोज्जीम खान, रुपाली दिक्षित, उज्ज्वला पगारे, दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी, मनिषा वानखेडे, डॉ.निलीमा चौरे, डॉ. रेश्मा उपाध्ये, डॉ. अनुपमा जावळे, अंबादार मोरे, प्रदीप करंकाळ, निलेश पाटील, समीर खेडकर, वैशाली मोरे, आनंद शिरापुरे, विद्या अहिरे, राजीव सुरवाडे, सचिन धनगर, योगेश पाटील व गोदावरी फाउंडेशन, टिसीआय फाउंडेशन, आधार संस्था यांनी सहकार्य केले.अमळनेर जळगावातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
तसेच तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयातंर्गत पाल, बोदवड, न्हावी, भडगाव, पारोळा, पाचोरा, यावल, धरणगाव, चोपडा, पिंपळगांव, येथे ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी केंद्राद्वारे माहितीपुस्तिका, पोस्टर्स प्रदर्शन, प्रभातपफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
 
प्रभातफेरीत शहरातील नंदिनीबाई विद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय, डॉ.वर्षा पाटील महाविद्यालय, फॅशन डिझायनिंग कॉलेज, आर.आर.विद्यालय, प.न.लुंकड कन्या विद्यालय, गुळवे विद्यालय, पार्वताबाई माध्य. विद्यालय, भाउसाहेब विद्यालय, ए.टी.झाांबरे विद्यालय, अ‍ॅग्लो उर्दू विद्यालय, अभिनव विद्यालय, जळगाव परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिंनी व शिक्षकवृंद जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@