पॅरिसमध्ये माजला गोंधळ; आणीबाणीची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |



पॅरिस : फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये काही दिवसांपासून हल्लकल्लोळ माजला आहे. महागाई आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे. सेंट्रल पॅरिसमध्ये आंदोलनकर्त्या युवकांनी अनेक वाहने आणि इमारतींना आग लावली आणि परिस्थिती आणखीन चिघळली. सरकार या परिस्थितीशी लढण्यासाठी आणीबाणी लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती फ्रान्स सरकारचे प्रवक्ता बेंजामिन ग्रीवोक्स यांनी माहिती दिली.

 

इंधन दरवाढीसंदर्भात आखलेल्या धोरणानुसार फ्रान्समध्ये दरवाढ करण्यात आली. मात्र, जनतेने याचा तीव्र विरोध करत आंदोलन पुकारले. आंदोलकांकडून सुरू असलेल्या हिंसेचे कदापी समर्थन केले जाणार नाही, असे फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅनुएल मॅक्रो यांनी स्पष्ट केले. या आंदोलकांनी गाड्या, इमारतींच्या काचा फोडल्या, दुकाने लुटली. करांमधली वाढ, महागाई आणि त्यामुळे वाढलेला राहणीमानाचा खर्च याला कंटाळून जनतेने हा रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे. पोलीस या आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधूर, पाण्याचा वापर करत आहेत. शहरातली अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.

 

आंदोलनात आतापर्यंत १३३ जण जखमी झाले आहेत तर ४१२ जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रपती एमॅनुएल मॅक्रो रविवारी उशिरा पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांसोबत एक आपत्कालीन बैठक घेणार आहेत. आंदोलनकांची चर्चा कशी करायची, हिंसक परिस्थिती कशी हाताळायची याबाबतची चर्चा या बैठकीत होणार आहे. या आंदोलकांना कोणतेही नेतृत्व नसल्याने चर्चेला नक्की कोणाशी आणि कशी सुरुवात करायची याचा धोरणात्मक विचार केला जाणार आहे. याच बैठकीत आणीबाणी लागू करण्याच्या पर्यायावरही विचार केला जाणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@