आसिया बीबीच्या सुटकेच्या निषेधामुळे धर्मगुरुंवर देशद्रोहाचा गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

 


 
 
इस्लामाबाद : ईशनिंदा केल्याप्रकरणी आसिया बीबी या महिलेची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. परंतु पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा खादिम हुसैन रिझवी यांनी निषेध केला. आसिया बीबीच्या सुटकेचा निषेध केल्याबद्दल खादिम हुसैन रिझवी यांच्यावर पाकिस्तानात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

आसिया बीबी ही एक ख्रिश्चन महिला आहे. दहा वर्षांपूर्वी तिच्या शेजारच्या मुस्लीम महिलांशी तिचे भांडण झाले होते. आसिया बीबी या मुस्लिम महिलांच्या घरातील पाणी प्यायली होती. त्यामुळे हे भांडण उद्भवले होते. या भांडणाच्यावेळी ईशनिंदा केल्याचा आरोप आसिया बीबीवर करण्यात आला होता. पाकिस्तानी सरकारचा मंत्री सलमान तासिर याने त्यावेळी आसिया बीबीची बाजू घेतली होती. त्यामुळे सलमान तासिरची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे ईशनिंदा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी आसिया बीबीला निर्दोष घोषित केले. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा पाकिस्तानातील कट्टरवादी विचारसरणीच्या लोकांनी निषेध केला. खादिम हुसैन रिझवी याने देखील या निकालाचा निषेध केला होता. तेहरिक-लबाईक पाकिस्तान हा खादिम हुसैन रिझवी याचा पक्ष आहे. रिझवी व त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंजाबमध्ये जाळपोळ केली होती. या जाळपोळी दरम्यान अनेक दुकाने जाळण्यात आली होती. अनेक घरांचेदेखील नुकसान झाले होते. त्यामुळे रिझवीवर दहशतवादाचा गुन्हादेखील पाकिस्तानात दाखल करण्यात आला आहे.

 

आसिया बीबीची निर्दोष सुटका करणाऱ्या न्यायाधीशाला फाशी द्या. लष्कर प्रमुखांविरुद्ध बंड करा”. अशा घोषणा खादिम हुसैन रिझवी याने पाकिस्तानात दिल्या होत्या. तसेच पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इमरान खान हे मुस्लिम नसून ज्यू आहेत’. अशी टीकादेखील रिझवीने केली होती. याप्रकरणी खादिम हुसैन रिझवीला २४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान पोलीसांकडून अटक करण्यात आली. पंजाबमधील हिंसाचारात रिझवीला साथ देणाऱ्या त्याच्या समर्थकांनादेखील अटक झाली आहे. अशी माहिती पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्याकडून देण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@