जामनेरात ना. महाजन यांचे स्वागत, मिरवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

मराठा आरक्षण मिळवून देण्यात जलसंपदा मंत्र्यांची महत्त्वाची भूमिका


 
 
जामनेर : 
 
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे शनिवारी सकाळी जिल्ह्यात आगमन होऊन जामनेरकडे येत असताना ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
 
जामनेरात पोहचण्यापूर्वी शहरातील बसस्थानक, नगरपालिका चौक ते ना. महाजनांच्या निवासस्थानी स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. मराठा आरक्षण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने मराठा समाज बांधवानी तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी ना. महाजन यांचे स्वागत केले.
 
ढोल ताशे, भगवे ध्वज आणि फटाक्यांची आतिषबाजी
 
ढोल ताशे लावून भगवे ध्वज फडकावून ,फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. जळगावकडून येत असतांना नेरी, चिंचखेडा, केकतनिंभोरा,पळासखेडा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.
 
माजी जि. प अध्यक्ष दिलीप खोडपे, भाजपा न.पा. गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, जे. के.चव्हाण, नगरसेवक अतिष झाल्टे, बाबुराव हिवराळे, धोंडू पाटील, अमर पाटील, डॉ.संजीव पाटील, सुहास पाटील, जयेश पाटील, दिपक पाटील, नितीन झाल्टे, जयवंत पाटील, तेजेश पाटील, बंटी वाघ, मयूर पाटील, कैलास पालवे आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@