मनपा, ‘सुप्रीम’ने साकारलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |
 
 
 
जळगाव : 
 
शहरातील मध्यवर्ती फुले मार्केट भागात शहर पोलीस स्टेशन शेजारी महापालिका आणि सुप्रीम इंडस्ट्रीज लि., गाडेगाव यांनी संयुक्तरित्या नागरिकांच्या सुविधेसाठी साकारलेल्या अत्याधुनिक सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे लोकार्पण शनिवार, 1 डिसेंबर रोजी सायंकाळी जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आयुक्त चंद्रकांत डांगे, महापौर सीमा भोळे, आ. सुरेश भोळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, ‘सुप्रीम’ चे वरीष्ठ महाव्यवस्थापक संजय प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.
हवा खेळती, थंड राहण्यासाठी एअर कुलिंग सिस्टिम्स
 
स्वच्छतागृहातील हवा खेळती व थंड राहण्यासाठी एअर कुलिंग सिस्टिम्स असून विजेची बचत व पर्यावरणपूरक एलईडी लाईटची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 
पाण्याच्या बचतीसाठी पायाने दाब दिल्यानंतर गरजे इतके पाणी बेसीनमध्ये हात धुण्यासाठी येणारे पॅडल कॉक मशीन बसविण्यात आले आहे.
 
या स्वच्छतागृहाचे अत्याधुनिक पद्धतीने दर्जेदार बांधकाम करण्यात आले असून आतून बाहेरून पूर्णपणे रंगाऐवजी टाईल्सचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सभोवती संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@