महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे प्रणेते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

धरणगावला गुलाबराव वाघ यांचे प्रतिपादन

 
धरणगाव :
 
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी व मागासलेल्या अनाथांच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या.
 
देशामध्ये महिला वर्गाला व मागासवर्गाला जे शैक्षणिक स्वातंत्र्य मिळालेले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय हे महात्मा फुले यांनाच जाते असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.
 
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने नगरपालिकेत प्रतिमा पूजनाप्रसंगी गुलाबराव वाघ बोलत होते. भानुदास विसावे यांनी सुध्दा समयोचित विचार व्यक्त करीत माता-भगिनींच्या सबलीकरणाचे आवाहन केले.
 
माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, उपनगराध्यक्ष वासुदेव चौधरी, गट नेते विनय भावे, कैलास माळी, नगरसेवक सुरेश महाजन, विलास महाजन, नंदकिशोर पाटील, नगरसेविका अंजली विसावे, किर्ती मराठे, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, विजय महाजन, किरण मराठे, गुलाब मराठे, जितेंद्र धनगर तसेच न.पा.कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@