भावी सैनिकांना मोफत भोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

सच्चे दोस्त फाउंडेशनचा उपक्रम, आजही वाटप


 
जळगाव : 
 
जळगावात सुरू असलेल्या सैन्य भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या युवकांना सच्चे दोस्त फाउंडेशनतर्फे 1 डिसेंबर रोजी आ.सुरेश भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे यांच्या हस्ते पुरीभाजीचे जेवण देण्यात आले. रविवारीही सच्चे दोस्त फाउंडेशनकडून सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना जेवण दिले जाणार आहे.
 
मागील काही दिवसांपासून जळगांव शहरात सैन्यभरतीचे आयोजन आहे. रविवार, 2 रोजी शेवटचा दिवस आहे. राज्यभरातून हजारो तरुण सैन्यात भरती होण्यासाठी शहरात आले आहेत. या तरुणांना जेवण, निवारा उपलब्ध होण्यास अडचणी आल्याने बराच त्रास सहन करावा लागत आहे.
 
हे सर्व लक्षात घेऊन शहरातील सच्चे दोस्त फाउंंडेशनचे अध्यक्ष शिरीष पाटील, उपाध्यक्ष प्रशांत गोयल, विक्की छाबला, जयेश पवार, केतन शर्मा, दीपक सोनी, जयेश सोनी, विक्की बग्गा, सागर वाणी, दीपक पाटील, महावीर लुनिया, जीवन अंभोरे, नंद वरयानी, मुकेश निंबालकर, वीरेंद्र अग्रवाल, नरेश पटेल’महेश मुनोत, विजय एदसंदनी, सौरभ हरणे, तुषार नंन्नवरे, कार्यकर्ते यांनी तातडीने बैठक घेऊन सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना जेवणाची सोय उपलब्ध करून दिली.
 
आ.राजुमामा भोळे यांच्या हस्ते 1 डिसेंबर रोजी पुरीभाजी वाटप करून फारच कमी वेळात नियोजन केले. यासाठी सच्चे दोस्त फाऊंडेशच्या उपक्रमाचे तरुणांनी कौतुक केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@