वैद्य उदय तल्हार यांना वै.खडीवाले पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
येथील प्रसिद्ध अग्निकर्म चिकित्सक वैद्य उदय गजानन तल्हार यांची यावर्षीच्या वै.खडीवाले पुरुस्कृत कै.वै.शंकरदाजीशास्त्री कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 
पुणे येथे 6 जानेवारी 2019 ला त्यांना हा पुरस्कार प्रदान होणार आहे. महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार मानला जातो. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे.
 
जळगावच्या वैद्यवर्गातून वैद्य नरेंद्र गुजराथी, वैद्य जयंत जहागिरदार, वैद्य पी.एस.चौधरी, वैद्य चंद्रकांत त्रिपाठी, वैद्य उषाताई जगताप, जिल्हा वैद्यगण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे. आ. सुरेश भोळे यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले.
@@AUTHORINFO_V1@@