हरियाणामध्ये पाचही महापालिका भाजपकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2018
Total Views |
 

चंदीगड : हरियाणामध्ये पाच महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यात पाचही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारत कॉंग्रेसला धुळ चारली आहे. ४५ नगरसेवकांच्या जागांवर भाजप उमेदवारांनी ताबा मिळवला.

 

या निवडणुकांमध्ये काँग्रेससह इतर पक्षांचा मात्र सुपडा साफ झाला. हरियाणातील पाच महापालिकांसाठी १६ डिसेंबरला मतदान झाले. या भाजप, काँग्रेस आणि स्थानिक पक्ष 'इंडियन नॅशनल लोकदल' या पक्षाने बसपसह आघाडी केली.

 

मात्र, या पक्षाचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही. या महापालिकांमध्ये हिसार, करनाल, रोहतक, यमुनानगर आणि पानीपत यांचा समावेश आहे. यापूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात मतदारांनी कॉंग्रेसला कौल दिला होता. मात्र, या निवडणूकांमध्ये भाजपने पुन्हा मुसंडी मारली

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 

@@AUTHORINFO_V1@@