विद्यार्थ्यांनी सामाजिकदृष्ट्या जागृत राहायला हवे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2018
Total Views |


मुंबई : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना सामाजिकदृष्ट्या जागृत राहिल्यास करिअर सोबतच जीवनातही यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात दि. १७ ते १९ डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय माध्यम कलोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी तावडे बोलत होते.

 

यावेळी आमदार ॲड. पराग अळवणी, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, बीएमएम विभागाचे प्रमुख गजेंद्र देवरा आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांचे चरित्र पुस्तक भेट देऊन तावडे यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजवाडे म्हणाले, शिक्षणमंत्री श्री. तावडे हे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल महाविद्यालयास अभिमान असल्याचे सांगत कौतुक केले. तावडे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने आपले छंद जोपासत असताना त्यात प्रगती करावी. अडथळे आले म्हणून आपली आवड, छंद हे बंद करु नयेत, यासाठी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहे. राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेत यशस्वी होणाऱ्यास नोकरीत पाच टक्के आरक्षण, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्यास थेट नोकरी देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे खेळाकडे करिअर म्हणून बघण्‍यास मदत होणार आहे.

 

शालेय व महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभागी झाल्याने आपला व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबरच आपले करिअर घडण्यासही मदत मिळते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवा जागृत ठेवल्यास करिअरसोबत जीवनातही यशस्वी होऊ शकतो. येत्या काळात भारतच सर्वांत तरुण देश असून संपूर्ण जगाला मनुष्यबळ पुरवेल यासाठी जगाच्या गरजा आळखून मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विकासावर शासन भर देत आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी शासन कायमच प्रयत्नशील असून महाराष्ट्र इंटरनॅशल एज्युकेशन बोर्डाशी सरकारी शाळा जोडणे, चीनच्या धर्तीवर ओपन बोर्ड स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तावडे यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. कलोत्सवातील विविध स्टॉलला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@