सेन्सेक्स १३७ तर निफ्टी ५८ अंशांनी वधारले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : कच्च्या तेलातील कमजोरी आणि रुपया मजबूत झाल्याने सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार वधारला. सेन्सेक्स १३७.२५ अंशांनी वधारुन ३६ हजार ४८४.३३ वर बंद झाला आहे. दरम्यान निफ्टी ५८.६० अंशांनी वधारून १० हजार ९६७.३०च्या स्तरावर पोहोचला आहे. बॅंकींग, ऑटो आदी शेअरमध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराला बळ मिळाले.

 

इंडिया बुल्स फायनान्स ८ टक्क्यांच्या मजबूतीसह निफ्टीमध्ये सर्वाधिक वधारणारा शेअर ठरला. बाजाज फिनसर्व्ह ४.११ टक्के एक्सिस बॅंक ३.५९ टक्के, भारती एअरटेल ३.४८, एशियन पेंट्स ३.२९ टक्क्यांनी वधारले. अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशनचा (आरकॉम) शेअर ९.५२ टक्क्यांच्या घसरणीसह १४.२६ रुपयांवर बंद झाला. दिवसभरात तो १२ टक्क्यांनी घसरला होता. रिलायन्स जिओशी होणारा आर कॉमचा होणारा स्पेक्ट्रमच्या कराराला मान्यता देण्यास टेलिकॉम मंत्रालयाने नकार दिल्याने आर कॉममध्ये मोठी घसरण झाली. अनिल अंबांनींना हा मोठा धक्का मानला जातो.

 

दरम्यान आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्री सुरूच आहे. एचसीएल टेक्नोलॉजीज निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरण झालेला शेअर ठरला. त्यात २.८५ टक्के घसरण झाली. इन्फोसिस १.७४ टक्के, टीसीएस १ टक्के घसरण नोंदवण्यात आली.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@