ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंतराव भालकर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2018
Total Views |


 

 

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष, संस्कार भारती कोल्हापूरचे विद्यमान अध्यक्ष आणि सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक यशवंतराव भालकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास राहत्या घरी त्यांचे आकस्मिक निधन झाले. सकाळी १० च्या सुमारास पंचगंगा नदी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

 

यशवंतराव भालकर यांनी कोल्हापूर चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्या तांबडीमाती' व शाहिर दादा कोंडके यांच्या 'सोंगाड्या' या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. पुढे १९७९ मध्ये ड्रेस डिपार्टमेंटमध्ये इस्त्रिमन म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत व्यावसायिक सुरुवात केली. १९८१ मध्ये 'डाळिंब' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. पुढे १४ वर्षे त्यांनी चित्रपटसृष्टीत खडतर प्रवास केला.

 

यशवंतराव भालकर यांना 'भरारी' या चित्रपटासाठी व्ही. शांताराम पुरस्कारासह ५ राज्य पुरस्कार मिळाले होते. त्यांनी आतापर्यंत १३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा 'राजमाता जिजाऊ' हा चित्रपट लंडनमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांना वृक्षारोपण आणि गड किल्ल्यांची पदभ्रमंतीची खूप आवड होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@