अॅसिड हल्ला पीडितेची भूमिका साकारणार दीपिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2018
Total Views |


 
 
 
 
मुंबई : अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनातील संघर्ष सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर दाखविला जाणार आहे. मेघना गुलजार या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून अभिनेत्री दीपिका पादुकोण या सिनेमात लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'छपाक' असे या सिनेमाचे नाव असणार आहे.
 

या सिनेमामध्ये दीपिकाच्या हिरोच्या भूमिकेत कोण दिसणार यासाठी अनेक अभिनेत्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेता राजकुमार राव यांची नावेही यासाठी चर्चेत होती. परंतु अभिनेता विक्रांत मेस्सी याची या भूमिकेसाठी निवड झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आजवर सहाय्यक भूमिका साकारणारा विक्रांत प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवालचा पती आलोक दीक्षितची व्यक्तिरेखा विक्रांत साकारणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी हे वृत्त खरे असल्याचे सांगितले.

 

 

 

याआधी 'राझी' या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलझार यांनी केले होते. राझी या सिनेमाला प्रेक्षक आणि समिक्षकांचे भरभरून प्रेम लाभले होते. आता अॅसिड हल्ल्यासारखा संवेदनशील विषय मेघना 'छपाक' या सिनेमात हातळणार आहेत. प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्याजोगे असेल.
 
 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/  
 
@@AUTHORINFO_V1@@