रेल्वे भरती आंदोलन : राज ठाकरेंना जामीन मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2018
Total Views |
 
 

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी दिवाणी फौजदारी न्यायालयाने दिलासा दिला आहे. २००८मध्ये परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला आहे.

 

रेल्वे भरती परीक्षेदरम्यान २१ ऑक्टोबर २००८ मध्ये मनसेने आंदोलन केले होते. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलवर दगडफेक केली होती. उत्तर भारतीयांविरोधात चिथावणी दिल्याच्या आरोपानुसार राज ठाकरे यांच्यासह आणखी सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. इगतपुरी न्यायालयात हा खटला सुरू आहे.

 

राज ठाकरे न्यायालयात हजर होत नसल्याने त्यांना वारंवार समन्स बजावण्यात आला होता. अखेर राज ठाकरे आज स्वत: सुनावणीसाठी इगतपुरी न्यायालयात हजर झाले. अखेर न्यायदंडाधिकारी के. आय खान यांनी राज ठाकरेंना जामीन मंजूर केला. मनसेचे माजी महापौर अशोक मूर्तडक यावेळी जामीनदार होते. राज ठाकरे यांच्या वतीने वकील सयाजी नागरे आणि अजय शिर्के यांनी मनसेची बाजू मांडली.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@