आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ‘कॅलिडोस्कोप’ पुस्तकाचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2018
Total Views |
 

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिक संघ, पनवेल येथे संवेदना रुग्ण सेवा समिती, सद्गुरू दादा रानडे ट्रस्ट, नवी मुंबई ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी कुलकर्णीच्या मदतीसाठी अनिरुद्ध भिडे सहकलाकार प्रस्तुतस्वर आले दुरूनीहा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच ब्राह्मण सभा, नवीन पनवेलचे मिलिंद गोखले आणि सहकलाकार प्रस्तुतस्वरगंधहे कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमामध्ये सृष्टी कुलकर्णीच्याकॅलिडोस्कोपया पुस्तकाचे प्रकाशन तिचा सत्कार, पनवेलचे . प्रशांत ठाकूर यांच्या करण्यात आला.

 

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाचा सामना करून आपल्या लढाऊपणाचे प्रदर्शन करतकॅलिडोस्कोपहे पुस्तक तिने लिहिले त्याचबरोबर अद्वितीय कामगिरी करत बी.एस्सी (रसायनशास्त्र) या विषयात मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. तिच्या या असामान्य कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या पुढील उपचारासाठी . प्रशांत ठाकूर यांनी २० हजार रुपयांची मदत केली.

 

संवेदना रुग्ण सेवा समिती, सद्गुरू दादा रानडे ट्रस्ट, नवी मुंबई ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांनी या कार्यक्रमाच्या देणगी, पुस्तक विक्री तिकिटांमधून मिळालेला सर्व निधी सृष्टी कुलकर्णीच्या उपचारासाठी पुढील शिक्षणासाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुस्तक देणगीसाठी ९८२२३३०४४८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@