वाजपेयींमुळे विमानावर ‘कॉमनमॅन’ अवतरला : मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2018
Total Views |
 


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर असून आज ते विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान कल्याण आणि पुणे मेट्रो, सिडको प्रकल्पांचे भूमिपूजन करणार आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे शैक्षणिक, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सकाळी मुंबईतील राजभवनात त्यांनी आर के लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारीत टाईमलेस लक्ष्मण या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आर. के. लक्ष्मण हे आमच्यासाठी कायम टाईमलेस असतील असे भावोद्गार पंतप्रधानांनी काढले. नरेंद्र मोदी म्हणाले, आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून भाष्य केले. पण त्यांनी कुणाला दुखावले नाही. त्यांची व्यंगचित्रे ही विचार करण्यास विचार करायचे, असे ते म्हणाले.

 

आर. के. लक्ष्मण यांनी त्याकाळी व्यंगचित्रातून खरडपट्टी काढण्याऐवजी मलमपट्टी केली. त्यांची व्यंगचित्रे परिस्थितीवर विचार करण्यास भाग पाडत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील कॉमनमॅनचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी त्यांच्या उड्डाण मंत्र्यांना भेटायला गेलो. विमानाच्या प्रवेशद्वारावर असलेला महाराजाचा मला खटकायचा आणि मी ईथे कॉमनमॅनचा फोटो का नाही, असा प्रश्न विचारला. वाजपेयीजींकडे ही गोष्ट गेल्यावर त्यांनी तत्काळ निर्णय घेतला आणि विमानाच्या प्रवेशद्वारावर कॉमनमॅनचा फोटो लागला


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@