प.रे.चा विना तिकीटवाल्यांवर कारवाईचा बडगा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |



मुंबई : पश्चिम रेल्वेद्वारे नोव्हेंबरमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांविरोधात अभियान चालवले गेले. यामुळे विना तिकीट आणि अनियमित यात्रा करणाऱ्यांच्या २.९३ लाख प्रकाराने पकडली गेली. यामध्ये १४.८१ करोड दंड वसूल झाला. मागच्यावर्षी पेक्षा हा आकडा ९५.३० टक्के जास्त आहे. याशिवाय रेल्वे परिसरात फिरणाऱ्या २४५ भिकारी आणि ५२० अनधिकृत फेरीवाल्यांकडूनही दंड वसूल केल्यानंतर त्यांना परिसराच्या बाहेर काढण्यात आले. तसेच ८० लोकांना तुरुंगात टाकण्यात आले.

 

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी श्री रवींद्र भाकर यांनी जरी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, नोव्हेंबर २०१८मध्ये पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने दलाल आणि असामाजिक तत्वांच्या विरुद्ध २४१ प्रकरणाची तपासणी करण्यात आली. यासंदर्भात १८८ लोकांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर रेल्वे अधिनियमानुसार विविध कलमांतर्गत मुकादम चालवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. याच काळात सुरक्षा रक्षकांकडून १२ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४१ शालेय विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेच्या महिला डब्यातून प्रवास करताना पहिले गेले, त्यानंतर त्यांना त्या डब्ब्यांमधून बाहेर काढले गेले.

 

पश्चिम रेल्वेतर्फे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दरवर्षी असे अभियान करत दोषींवर कारवाई केली जाते. अधिकृतपणे रेल्वने प्रवास करणाऱ्यांना चांगल्या सुविधा पुरवणे तसेच विना तिकीट प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून अशी पाऊले उचलली जातात. पश्चिम रेल्वेकडून सामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे कि प्रवाशांनी तिकीट विकत घेऊन सन्मानाने प्रवास करा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@