दलालांशिवाय लष्कर खरेदी होते यावर काँग्रेसचा विश्वासच नाही : निर्मला सीतारामन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : “राफेल डील प्रकरणी काँग्रेस जाणूनबुजून लोकांची दिशाभूल करत आहे. विनाशस्त्र विमानाच्या सामान्य किंमतीशी संपूर्ण शस्त्रसज्ज अशा लढाऊ विमानासोबत तुलना काँग्रेस करत आहे.” असे देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. सोमवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
 

काँग्रेस सत्तेत असतानाच्या काळात संरक्षण खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. राफेल प्रकरणी आम्ही निर्णय घेतला याचा काँग्रेसला त्रास झाला.” असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी म्हटले. “राफेलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खोटा आहे. काँग्रेसजवळ आता प्रचारासाठी मुद्दा नसल्याने ते असा खोटा प्रचार करत आहेत. असे सीतारामन यांनी म्हटले. ऑफसेट कराराचा सरकारशी काहीही संबंध नाही. जेव्हा दोन सरकारांमध्ये करार होतो. तेव्हा भागीदार कोण आहे, याचा सरकारशी संबंध नसतो.” असे त्या म्हणाल्या.

 

आम्ही राफेल विमानांच्या किंमती कॅगला सांगितल्या असून संसदीय व्यवस्थेमध्ये कॅग या किंमतींवर लक्ष देईल. त्यांनतर त्याचा अहवाल संसदेच्या पीएसी समितीकडे देण्यात येईल. पीएसीने हा अहवाल तपासल्यानंतर ही कागदपत्रे सार्वजनिक करण्यात येतील, ही एक प्रक्रिया आहे.” असे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

 
 
 

राफेल प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी भाजपकडून देशभरात ७० पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसने जे कारस्थान रचले आहे. ते उघड करण्यासाठी या पत्रकार परिषदा घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती राज्यसभा सदस्य आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलूनी यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@