जुहूमध्ये पर्यावरण उपक्रमासाठी हजारो नागरिकांचा हातभार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |


 


मुंबई : जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याच्या समस्येवर #SaveTheBeach या उपक्रमाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजनेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील १०००हून अधिक रहिवासीया जनजागृती अभियान व किनारा स्वच्छता अभियानासाठी एकत्र आले. #SaveTheBeach हा बहु-भाग धारकांचा समावेश असलेला उपक्रम असून त्यात बृहन्मुंबई महानगरपालिका, मिशन ग्रीन मुंबई, कोरोना हा जागतिक पातळीवरील बिअरब्रँड, अर्थ डे नेटवर्क, जुहू - सोल ऑफ मुंबई सिटी, फॉरवर्ड ६९, यांचा समावेश आहे. यावर्षी ५ जून २०१८ रोजी जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला. या दिवशी जुहू समुद्र किनाऱ्याची स्वच्छता आणि पुनर्विकास करण्यासाठी ५००० मुंबईकर एकत्रित आले होते. #SaveTheBeach उपक्रमाचा भाग म्हणून गेल्या काही महिन्यात अनेक समुद्रकिनारा स्वच्छता अभियानांच्या माध्यमातून २,००,००० किलो कचरा गोळा करण्यात आला.

 

समुद्र किनारा स्वच्छता आणि जनजागृती अभियानांप्रमाणेच यात सक्रिय सहभागी होणाऱ्या व्यक्ती आणि स्वेच्छाकार्यकर्ता गटांचा सत्कार करण्यात आला. समुद्रातील जीवनाबद्दल जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी आणि लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी सँक्चुअरी एशिया आणि नेचरिस्ट फाउंडेशनतर्फे 'डिस्कव्हर द लिव्हिंग बीच' या समुद्रकिनाराभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत १०हून अधिक 'डिस्कव्हर द लिव्हिंग बीच' या भ्रमंती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या फेरफटक्यादरम्यान काढलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन या कार्यक्रमादरम्यान भरविण्यात आले होते. या छायाचित्रकारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समुद्राशी संबंधित वेष परिधान करून नाटुकले सादर केले. याला पुष्टी जोडत जुहू विभागाच्या नगरसेवक आणि जुहू - सोल ऑफ मुंबई सिटी आणि फॉरवर्ड ६९ या संस्थांच्या संस्थापक व पर्यावरण कार्यकर्त्या रेणूहंस राज म्हणाल्या, "गेल्या काही वर्षात समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी खूप प्रयत्न करण्यात आल्याचे आपण पाहिले आहे. असे असूनही अजूनही अनेक प्रयत्नांची आवश्यकता आहे. स्वच्छतेबाबत सामान्यांमध्ये असलेल्या जाणीवांमध्ये प्रचंड फरक पडला आहे. असे असले तरी हा सगळा कचरा गटारांमधून वाहून समुद्रात सोडणे समस्येच्या मूळकारणावर उपाय शोधणे हे सध्याचे आव्हान आहे. या मूळ कारणावर आपण एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे आणि विविध संस्थावर हिवासी गट एकत्र येऊन हा बदल घडवून आणू शकतात, असा माझा दृढविश्वास आहे."

 

या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना अॅनह्युझर - बुशइन बेव्हचे (एबीइनबेव्ह) भारतातील अध्यक्ष बेन व्हरहार्ट म्हणाले, "या उपक्रमात कार्यकर्ते आणि रहिवासी गटांचा सहभाग पाहून आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. जुहू समुद्रकिनारा अधिक स्वच्छ आणि फिरण्यासाठी अनुकूलकरण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना स्थानिक विभाग प्रशासन आणि महानगर पालिका यांनी सातत्याने दिलेल्या मदतीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. समुद्र किनाऱ्यावर होणारी घाण आणि कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि दीर्घकालीन उपाययोजना उपलब्ध करून देण्यात भूमिका निभावता आल्याचा आम्हाला अभिमान आहे."

 

दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जुहू विभागाच्या नगरसेवक आणि जुहू - सोल ऑफ मुंबई सिटी आणि फॉरवर्ड६९ या संस्थांच्या संस्थापक व पर्यावरण कार्यकर्त्या रेणू हंसराज, मुंबईतील अर्थ डे नेटवर्कच्या आशियातील विभागीय संचालक डॉ. करुणासिंग, रिव्हर मार्च या संस्थेच्या व्यवस्थापन समितीमधील सदस्य महेश थवानी, अर्थ ५ आरचे सौरभ गुप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सागरी मंडळाचे (गृहखाते) उपसंचालक जितेंद्र राय सिंघानी उपस्थित होते. या प्रसंगी प्रतिक्रिया देताना अर्थ डे नेटवर्कच्या आशियातील विभागीय संचालक डॉ. करुणा सिंग म्हणाल्या, "जुहूमधील #SaveTheBeach या उपक्रमात सहभागी झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. एंड प्लास्टिक पोल्युशन (प्लास्टिक प्रदूषणाचे उच्चाटन) या आमच्या जागतिक पातळीवरील अभियानावर आणि प्रोटेक्ट अवर स्पिशीज (आपल्या प्रजातींना वाचवा) या २०१९ सालातील जागतिक पातळीवरील संकल्पनेवर या उपक्रमाच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. #SaveTheBeach अभियानासह आम्ही प्लास्टिकच्या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि सागरी जीवनाच्या वैविध्यतेचे संवर्धन याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी काम करत आहोत. कोरोनासोबत असलेली ही भागीदारी अधिक वाढूनही चळवळ फोफावत जाईल, अशी आमची आशा आहे."

 

कोरोनाने १९२५ या त्यांच्या स्थापना वर्षापासूनच समुद्रकिनाऱ्याचे आपल्या ग्राहकांशी एक भावनिक नाते विकसित केले आहे. कोरोनाचे 'सेव्ह द बीच' हे 'क्लीनवेव्ह्ज' या कोरोनाच्या जागतिक पातळीवरील प्रयत्नांचे विस्तारीकरण आहे. 'पार्ले विथ द ओशन्स' या संस्थेसह जगभरातील १०० समुद्र किनाऱ्यांचे संवर्धन करण्यासाठी कोरोना काम करत आहे. या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करताना ए बी इन बेव्हचे मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष कार्तिकेय शर्मा म्हणाले, "समुद्र किनारा हा कोरोनाच्या डीएनएचा एक महत्त्वाचा घटक आहे. गेल्यावेळी आम्हाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्हाला खूपच आनंद झाला होता आणि समुद्र किनारा अधिक फिरण्यायोग्य करणारे अजून एक जनजागृती अभियान आयोजित करण्यास आम्ही उत्सुक आहोत. अशा प्रकारच्या विविध अभियानांच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यावरणाचे संरक्षण करता येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अप सायकलिंगला पाठींबा देणारे खंदे कार्यकर्ते तयार करू शकू आणि आपले हे नंदनवन स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करू शकू, अशी आमची आशा आहे." आमच्या ब्रँडच्या माध्यमातून २०२५ सालापर्यंत शाश्वत ध्येये कशा प्रकारे साध्य करणार आहोत याचे #SaveTheBeach हे उदाहरण आहे." समाजाचा उत्कर्ष करण्याची खातरजमा करण्यासाठी ए बी इन बेव्हतर्फे शाश्वतता १००+ ध्येये निश्चित करण्यात आली आहेत, ज्यात स्मार्ट शेती, जलसंवर्धन, क्लायमेट अॅक्शन आणि सर्क्युलर पॅकेजिंगवर भर देण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@