नांद्रा येथे जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |
 
 
 
पाचोरा :
 
जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या टप्प्यात नांद्रा येथील नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यात 1 कोटी 16 लाख 30 हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
 
यात कृषी विभागातील नाला खोलीकरण, बांध बंधिस्ती, सिमेंट बांध दुरुस्ती ,पाझर तलाव दुरुस्ती,साठवन बंधारा, गाव तलाव दुरुस्ती, नवीन साठवण बंधारे,वनविभागात समतल सलग चर,ओहक नियंत्रण ,वन बंधारा,विहिर पुन्नर्भरण अशा विविध कामांचा यात समावेश आहे.
 
या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर, वन परीक्षेत्र अधिकारी डि,एस.देसाई, जि.प.सदस्य पदमसिंग पाटील ,माजी सभापती रविंद्र पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, सरपंच शिवाजी तावडे, एस.डी.पाटील,के.एन.घोडके,जि.एस.पाटील ,चेतन बागुल,तंटामुक्तचे अध्यक्ष सुभाष पाटील, पहाण सरपंच आप्पा महाजन ,मधुकर पैठणकर, राजेंद्र तायडे, उपतालुका प्रमुख विनोद बाविस्कर, रामचंद्र धनगर, युवराज काळे, सुनिल पाटील,प्रकाश पाटील, माजी सरपंच सुभाष तावडे, ठेकेदार सुभाष पाटील,मंगेश देवरे,बालाजी पाटील ,उपसरपंच बालु पाटील,ग्रा.प.सदस्य साहेबराव साळवे,प्रा.यशवंत पवार ,स्विय सहाय्यक राजु पाटील,ग्रामविकास अधिकारी एस.एस.सत्रे ,रविकांत सुर्यवंशी ,पत्रकार राजेंद्र पाटील,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
दिवसेंदिवस पाण्याचे जाणवत असलेले टंचाई र शेत शिवारातील वाहून जाणारे पाणी आपल्या शिवारात जिरवण्यासाठी जलयुक्त शिवार या योजनेला शेतकरी वर्गाने सहकार्य करावे व यासाठी स्वत: आपला सहभाग नोंदवून या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकूर यांनी
केले.
@@AUTHORINFO_V1@@