डोकारे येथे एचआयव्ही समुपदेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

सहकारी साखर कारखान्यात कामगारांना मार्गदर्शन


डोकारे ता. नवापूर : 
 
तालुक्यातील डोकारे येथे एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र , उप जिल्हारुग्णालय नवापूर आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ.कीर्तीलता वसावे आणि कार्यकारी संचालक विजयानन्द कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी सहकारी साखर कारखाना येथे कामगारांसाठी एड्स सल्ला मार्गदर्शन व चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले .
 
 
कामगारांना दैनंदिन जीवनात कामावर असताना, व्यसनाधीनता आणि रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होवून क्षयरोग, एचआयव्ही,कॅन्सर यासारख्या अनेक आजारांचे संसर्ग होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांची आरोग्य तपासणी होवून आजारांचे निदान व्हावे व त्यांना मोफत उपचार मिळावेत यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 
 
या शिबिरात एचआयव्ही तपासणीसह रक्तदाब, मौखिक आरोग्य , एचबी, डायबेटीस, सीबीसी, लिपिड प्रोफाईल, सिकलसेल अशा अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
 
एनसीडी विभागाचे डॉ.धिरेन्द्र चव्हाण यांनी सर्व कामगारांची तपासणी करून करून बीपी, डायबेटीस, दमा, कॅन्सर या आजाराविषयी माहिती दिली. तसेच नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक कैलास माळी आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाचे सुभाष निकम यांनी एचआयव्ही एड्स विषयी सविस्तर माहिती देवून एचआयव्ही तपसणीचे महत्व पटवून दिले.
 
 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश आहेरराव यांनी रक्त नमुन्याची चाचणी केली. एनसीडी विभागाचे सुभाष गावित व स्टाफ नर्स सोनाली मन्द्रे यांनी रक्तदाब तपासणी केली.
 
 
क्षयरोग विभागाच्या वतीने पर्यवेक्षक सचिन लोहारे व रवींद्र बागूल यांनी क्षयरोग तपासणीसाठी संशयित रुग्णांचे थुंकी नमुने गोळा केले. शिबिर यशस्वीतेसाठी कारखान्याचे कामगार अधिकारी दिलीप पवार डॉ.नीलेश गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@