राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महानगर यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 68 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
 
याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगरचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, कार्याध्यक्ष विलास पाटील यांच्याहस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
 
त्यानंतर वाय.एस.महाजन यांनी उपस्थितीतांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव करुन मार्गदर्शन करुन सूत्रसंचालन केले.
 
 
यावेळी योगेश देसले, निला चौधरी, शकिला तडवी, ममता सोनवणे, मालती सैंदाणे, अरविंद मानकरी, सुदाम पाटील, राजू बाविस्कर आदी कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@