फैजपुरला भारतरत्न वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

फैजपूर ता यावल :
 
भाजपा महिला पदाधिकारी व लेवाशक्ती महिला मंचच्या विद्यमाने त्रिमूर्ती चौक येथे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
 
याप्रसंगी पटेल यांच्या तैलचित्रचे विधिवत पूजन करून माल्यार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
दुसरा कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुलात दिपाली मोबाईल व व्यापारी वर्ग विद्यमाने आयोजित कार्यक्रमात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तैलचित्राला उपस्थित मान्यवर हस्ते माल्यार्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
 
 
यावेळी बी.के.चौधरी, संजय सराफ, प्रमिला कोल्हे, संगीता चौधरी, गणेश गुरव,यांनी समयोचित मनोगत मांडली तर सूत्रसंचालन संजय सराफ व दीपक धांडे व आभार जयश्री चौधरी व संदीप पाटील यांनी मानले
 
 
याप्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य बी. के. चौधरी, उपनगराध्यक्ष कलीमखान मणियार, नगरसेवक रशीद तडवी, भाजप शहराध्यक्ष संजय रल, व्यापारी असो सचिव संजय सराफ, माजी नगरसेविक प्रमिला कोल्हे, नरेंद्र चौधरी, देवेंद्र झोपे, रुपम महाजन, राजेश इंगळे, भूषण इंगळे, टेकचंद कोल्हे ,महेंद्र धांडे, गुडू शेख, नाजीम शेख,प्रभाकर तळेले, उमेश वायकोळे, संजय राजपूत, मनोज राणे, श्रीकांत माहुरकर, नंदू साळी, मुकेश बोरसे, गिरीश बेंडाळे आदी व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
@@AUTHORINFO_V1@@